अहमदनगर जिल्हा रोलबॉल संघटनेच्या वतीने सब ज्युनिअर (१४ वर्ष) मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय स्पर्धा व संघ निवड चाचणीचे ४ ऑगस्ट रोजी आयोजन-अध्यक्षा सौ.सविता पाटोळे
अहमदनगर (दि.२२ जुलै प्रतिनिधी):-डी पॉल स्कूल येथे जिल्हा रोल बॉल संघटना व श्रीरामपूर तालुका रोल बॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने १८ वी जिल्हा स्तर रोल बॉल स्पर्धा व जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याचे संघटनेच्या अध्यक्षा सौ.सविता पाटोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बुलढाणा येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेस या जिल्हा स्पर्धा निवड चाचणी मधून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव श्री. प्रदीप पाटोळे यांनी सांगितले.सदर स्पर्धांसाठी खेळाडूंचा जन्म १.१.२०११ किंवा त्या नंतरचा असावा स्पर्धा रविवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सुरू होतील तसेच विजत्या खेळाडूंना प्राविण्य प्रमाण पत्र व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार असल्याचे तालुका संघटना सचिव श्री.आनंद पटेकर यांनी सांगितले.
सदर स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घाव्या असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.स्पर्धेच्या अधिक माहिती करीता संपर्क श्री.प्रदीप पाटोळे ८२७५१९१७७१ व श्री.आनंद पटेकर ९८९०७४४४९० यांच्याशी संपर्क साधावा.