सरपंचावर जीवघेणा हल्ला कोयत्याचा सर्रास वापर
अहमदनगर (दि.२१ जुलै):-नगर तालुक्यातील घोसपुरी गावातील रस्त्याचे मुरुमीकरण सुरु असताना माझ्या घरासमोर मुरूम का टाकला असे म्हणत मागासवर्गीय सरपंचावर कोयत्याने हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि.२०) जुलै रोजी दुपारी घडली आहे.यातील हल्लेखोर अय्याज शौकत शेख याच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न,आर्म ॲक्ट सह ॲट्रॉसिटी नुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत घोसपुरीचे सरपंच किरण साळवे यांनी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अधिक तपास ग्रामीणचे प्रभारी उपअधीक्षक अमोल भारती यांच्याकड़े देण्यात आला आहे.