हुंड्यासाठी विवाहितेचा छळ विषारी फिनेलची बाटली ओतली विवाहीतेच्या तोंडात
अहमदनगर (दि.२२ जुलै):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे यात लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून दुसरे लग्न करण्यासाठी सोडचिठ्ठी दे अन्यथा तुझ्या लहान बहिणीशी मला लग्न करायचे आहे असे सांगत विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ करताना घरातील विषारी फिनेल बाटली विवाहीतेच्या तोंडात ओतल्या प्रकरणी सासरच्या दोन जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रेश्मा सुनिल साळवे चिंचविहीरे यांनी तक्रार दाखल केली आहे. साळवे यांचे पती सुनिल कारभारी साळवे हे बाहेर नोकरीला आहेत.२४ जून २०१८ रोजी त्यांचा विवाह झाल्यानंतर सासरच्या लोकांनी रेश्मा साळवे यांना चांगल्या पद्धतीने नांदविले. त्यानंतर सुनिल सुट्टीला घरी आल्यानंतर विवाहीता रेश्मा यांच्याशी काही ना कारणास्तव वाद घालत मारहाण करू लागला.
सासू मंदा यांच्या कडूनही मारहाण होत होती.७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी दारू पिऊन आलेल्या पती सुनिल याने विनाकारण मारहाण केली.तुला मुलगा होत नाही.तुझ्या आईने लग्नात हुंडा दिला नाही. तुझ्या आईकडून दोन लाखाचा हुंडा आण. तुझ्यामुळे मला दूसरे लग्न करता येत नाही. मला सोडचिठ्ठी देत असे सांगितल्यानंतर विवाहीता रेश्मा यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे शारिरीक व मानसिक छळ करीत तुझ्या लहान बहिणीशी माझे लग्र लावून दे असे वारंवार सांगत घरातील फिनेलची बाटली तोंडात ओतली.अशा फिर्यादीनुसार रेश्मा साळवे यांनी पती व सासू विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.अधिक तपास पोलीस करीत आहेत.