अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे दोघे जेरबंद एमआयडीसी पोलिसांचा जेऊरमध्ये सापळा
अहमदनगर (दि.२७ प्रतिनिधी):-अवैधरित्या गोवंशीय जनावरे वाहतूक करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह एमआयडीसी पोलीसांनी छत्रपती संभाजी नगर रोडवर पकडले. दि.२७ जुलै २०२४ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की छत्रपती संभाजीनगर ते अहमदगनरकडे जाणाऱ्या हायवेरोडने एक अशोक लेलॅण्ड कंपनीच्या टेम्पोमध्ये गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्यासाठी जनावराची बेकायदेशीर वाहतुक करुन घेवुन जानार आहेत अशी माहीती मिळाल्यावर एमआयडीसी सपोनि/ चौधरी यांनी लागलीच मिळालेल्या माहीतीनुसार पोलीस उपनिरीक्षक/मनोज मोंढे यांचे सह एक पथक तयार करुन बातमीतील नमुद ठिकाणी कारवाई करने कामी त्यांना रवाना केले.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक/मोंढे यांनी दोन पंच यांना जेऊर स्टॅण्डवर बोलावुन छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर हायवे रोडवर सापळा लावला असता पहाटेचे सुमारास एक पांढऱ्या रंगाचा अशोक लेलॅण्ड कंपनीचा येताना दिसल्याने त्यास पंचासमक्ष थांबन्याचा इशारा करुन रोडचे कडेला थांबवण्यास सागुन सदर टेम्पो थांबल्यावर सदर वाहनावरील वाहनचालकाकडे तसेच त्याच्या जोडीदाराकडे चौकशी केली असता त्यांनी उड़वा उडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्यांना पंच व पोलीसांची ओळख सांगुन सदर वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर वाहनाचे पाठीमागील ट्रॉलीमध्ये चार गोवंशीय वासरे व तीन मोठया गाई दिसुन आल्याने पंचासमक्ष चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव इरफानहनीफ कुरेशी सांगितले व त्याचा जोडीदार त्याचे नाव जमीर सत्तार कुरेशी रा. झेंडीगेट अशी असल्याचे सांगीतले त्यांचे कब्जात मिळून आलेल्या गोवंशीय जातीचे जनावरे मिळून आल्याने पोसई/मोंढे यांनी पंचांसमक्ष पंचनामा करुन वाहन व जनावरे व आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द एमआयडीसी पोस्टे गु.रजि.नं. ५९२/२०२४ महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम१९७६ चे कलम ११(१)(ई)(ड) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ५,९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग श्री.संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/ श्री.माणीक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोउपनिरीक्षक/मनोज मोंढे,पोना/विष्णु भागवत,पोकॉ/सुरज देशमुख,पोकॉ/जयसींग शिंदे,पोकॉ/सुरेश सानप, पोकॉ/नागरे यांनी केली आहे.