शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे दोघे ताब्यात
अहमदनगर (दि.२७ जुलै):-शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या दोन आरोपीस शेवगाव पोलीसांनी अटक केले आहे.बातमीची हकिकत आशिकी फिर्यादी नामे नवनाथ हरिशचंद्र इसरवाडे (रा.गदेवाडी ता.शेवगाव जि.अहमदनगर) यांची AK ट्रेडिंग कंपनी नावाचे शेअर मार्केट गदेवाडी येथे ५,००,०००/- रुपयांची फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांच्या दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.६१७/२०२४ भादवि कलम-४२०,४०९,४०६,३४ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिल पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवुन त्यांनी एक तपास पथक तयार केले.उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की,या गुन्ह्यातील आरोपी अशोक बाबुराव कदम,लक्ष्मण उर्फ बबलु दत्तात्रय मडके दोघे (रा.गदेवाडी ता.शेवगाव) हे गदेवाडी तसेच बोधेगाव गावामध्ये गेल्यास आरोपी मिळुन येतील अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्यासह तपास पथक रवाना केले.
सदर ठिकाणी तपास पथकाने आरोपीची पाहणी केली असता नमुद गुन्ह्यातील आरोपीला पोलीसांची चाहुल लागल्याने सदरचे आरोपी पळुन जात असतांना तपास पथकाने सदर आरोपीना गदेवाडी व बोधेगाव येथुन ताब्यात घेवुन गुन्ह्यात अटक केली.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल,पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार,पोहेकॉ/परशुराम नाकाडे,पोकॉ/शाम गुंजाळ,पोकॉ/ बाप्पासाहेब धाकतोडे, पोकॉ/संतोष वाघ,पोकॉ/ संपत खेडकर,पोकॉ) एकनाथ गरकळ,पोकॉ/ राहुल खेडकर यांनी केली असुन पुढील तपास पोसई/अमोल पवार हे करत आहेत.