न्याय न मिळाल्यास औटी यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आत्मदहनाचा इशारा
अहमदनगर (दि.२९ जुलै):-पैशाची अडचण आल्याने मध्यस्थी मार्फत सोनई येथील गाळे गहाण ठेवले होते.
गहाण ठेवलेले गाळे ताब्यात घेण्यासाठी गेलो असता अशोक कुसळकर व संदीप कुसळकर यांनी वर्तमानपत्रात खोट्या बातम्या देऊन बदनामी करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या संदर्भात अनिल औटी यांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी अर्ज देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही.त्यामुळे अनिल औटी यांनी पुन्हा आज दि.२९ जुलै २०२४ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून समक्ष निवेदन दिले असून येत्या आठ दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा औटी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.