स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्ह्यात अवैध धंद्यांवर छापेमारी
अहमदनगर प्रतिनिधी:-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे.यात अहमदनगर शहरातील बिंगो अड्डा, देशी विदेशी दारू गावठी हातभट्टी तसेच शेवगाव,पाथर्डी येथील अवैध धंद्यांवर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण १६ ठिकाणी छापे टाकून २२ जणांवर कारवाई केली आहे.
यात त्यांच्याकडून २ लाख ४३ आजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाया जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहेत.