
अहमदनगर (दि ३० जुलै):-श्रीरामपूर मधील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेच्या पगारातून खोट्या पद्धतीने क्रेडिट सोसायटीची कपात दाखवून तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सहशिक्षिका सुनंदा बारकू शेळके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.झालेल्या या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मगरे करीत आहेत.
