अहमदनगर (दि.१ ऑगस्ट):-साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त नगर शहरात भव्य जयंती उत्सवाचे आयोजन विविध मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.यावेळी मनपा मा.स्थायी समिती सभापती कुमार वाकळे यांनी शहरातील सिद्धार्थ नगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
व यावेळी अण्णाभाऊंनी केलेल्या कार्याची माहिती दिली,तुकाराम भाऊराव साठे (अण्णाभाऊ साठे) यांचा जन्म १ऑगस्ट १९२०- १८ जुलै १९६९ प्रतिकुल परिस्थितीतही जातीभेद,भांडवलदार,अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरुद्ध आपली लेखणी उगारणारे,लेखणीच्या जोरावर परिवर्तनाच्या चळवळीस ताकत देणारे,स्वातंत्र लढ्यात सभा मोर्चे गाजवणारे शेतकरी कामगार यांच्या अन्यायाला लेखणीद्वारे वाचा फोडणारे हालाखीच्या परिस्थितीतही परिस्थितीस शरण न जाणारे देश विदेशात आपल्या साहित्याचा ठसा उमटवणारे.३७ कादंबऱ्या (यातील ७ कादंम्बऱ्यावर चित्रपट निघाले )११ कथासंग्रह,२ नाटके,१ प्रवासवर्णन,१० लोकनाटय,२ शाहिरी वाड्मय लिहणारे,असे अण्णाभाऊ साठे यांचे कार्य देशासाठी महान होते असे ते म्हणाले.
