Maharashtra247

चिंचोली गुरवमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन ठिकाणी घरफोड्या; पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी गावकऱ्यांची मागणी 

 

 

संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या चिंचोली गुरव या गावात एका रात्रीत दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून चोरट्यांनी अक्षरशा धुमाकूळ घातला आहे.या अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे महागडे दागिने चोरून नेले आहेत.

बबन भीमराज गोडगे आणि नानासाहेब त्र्यंबक गोडगे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गुरुवारी मध्यरात्री या दोन्हीही घरांचे दरवाजे उघडून चोरट्यांनी दागिने लंपास केले आहेत.यामध्ये नानासाहेब गोडगे यांचे 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व कानातले चोरले आहेत.तर बबन गोडगे यांचे देखील 62 हजार 900 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत.

यापूर्वी देखील गावातील शेतकऱ्यांचे वीजपंप मोठ्या प्रमाणात चोरी झालेले आहेत.आणि अशा होणाऱ्या वारंवार घटनेमुळे नागरिक शेतकरी अत्यंत त्रस्त झाले आहेत.यामुळे गावात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी ज्याने चोरीला आळा बसेल अशी नागरिकांची मागणी आहे. 

 

You cannot copy content of this page