महालक्ष्मीआई देवस्थान माळीवाडा येथे रविवारी यात्रा उत्सवाचे नियोजन
अहमदनगर (दि.३ ऑगस्ट):-नगर शहरातील माळीवाडा येथे सालाबाद प्रमाणे आषाढी अमावस्या दि.४/८/२०२४ (रविवारी) रोजी जागृत नवसाला पावणारी लक्ष्मीआई यात्रा संपन्न होणार आहे.
महालक्ष्मी आई पालखीचे मानकरी मुख्य भगत पोपटराव (नाना) साठे यांच्या हस्ते प्रवरासंगम येथून कावडीने आणलेले गंगा स्नान सकाळी ७ वाजता देवी आईचा पंचामृताने अभिषेक होणार आहे.तसेच दुपारी १२ वाजता देवीचे मुख्य भगत पोपटराव साठे व देवस्थानचे अध्यक्ष उमेश साठे यांच्या राहत्या घरापासून देवीच्या पुरातन महालक्ष्मी मुखवटेंची पादुकांची व सुहासिनी कलशची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तसेच १२.२३० वा.पालखीची भव्य मिरवणूक निघणार आहे तरी सर्व समाज भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मातंग समाज पंच कमिटी व महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष उमेश साठे यांनी केले आहे.