खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना एलसीबीने ठोकल्या बेड्या
अहमदनगर (दि.३ ऑगस्ट):-शेवगाव तालुक्यातील चांदगांव येथील शेतातील रस्त्याच्या कारणावरुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या २ आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे.बातमीची हकीगत अशी की,दि.13 जुलै 2024 रोजी फिर्यादी श्री.गोपीचंद अश्रु पोपळे (रा.बेलगांव,ता.शेवगांव) हे त्यांची पत्नी व मुलगा असे त्यांचे शेतामध्ये खताची गाडी येण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करताना इसम नामे रामदास गायके व इतर 5 अशांनी संगनमत करुन तुम्ही रस्त्यात खड्डे का करता व आमच्या शेतात पाणी सोडल्याने आमचे शेताचे नुकसान होते असे म्हणुन हातातील कु-हाड, लाकडी दांडके,काठ्या व कोयता घेवुन फिर्यादी व त्यांचे कुटूंबियांना जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केले बाबत शेवगांव पो.स्टे. येथे गु.र.नं. 599/2024 भारतीय न्याय संहिता कलम 109 (1), 189 (2), 191 (2), 193 (3), 190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना घडल्या पासुन यातील आरोपी हे फरार झाले होते.यातील आरोपी फरार असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन, आवश्यक कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन आरोपीची माहिती काढणेकामी आवश्यक सुचना देवुन रवाना केले.पथक तांत्रिक विश्लेषण व गुप्तबातमीदारा मार्फत फरार आरोपींची माहिती घेत असताना गुप्तबातमीदारा मार्फत आरोपी नामे महादेव गायके व गणेश गायके हे पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर कारखाना परिसरात आले आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने,पथकाने लागलीच वृध्देश्वर कारखाना,ता. पाथर्डी परिसरात जावुन फरार आरोपींचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांनी नावे महादेव अंकुश गायके, गणेश जालींदर गायके (दोन्ही रा.बेलगांव,ता. शेवगांव) असे सांगितले. त्यांचे कडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता दोन्ही आरोपींनी शेतातील रस्त्याचे कारणावरुन मारहाण केल्याचे सांगितल्याने त्यांना शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, पोहेकॉ/संतोष लोढे, पोना/फुरकान शेख, पोकॉ/रविंद्र घुगांसे, जालींदर माने,मयुर गायकवाड,चापोहेकॉ/ उध्दव टेकाळे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.