कोतवाली पोलिसांनी दाखवली माणुसकी;पोनि.प्रताप दराडे GREAT PERSON
अहमदनगर (दि.३ ऑगस्ट):-कोतवाली पोलीस स्टेशन येथे रात्री ११/०० वा.अमरधाम, नालेगाव येथील वॉचमन याने कोतवाली पोलीस स्टेशन येथे येवून शहर उपविभागिय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती व कोतवालीचे पोलीस निरीक्षक श्री.प्रताप पांडुरंग दराडे यांचे समोर येवुन सांगितले की,अमरधाम, नालेगाव येथील एका खोलीत नवजात मृत अभ्रक कोणीतरी ठेवुन गेले आहे.
त्यानंतर अमरधाम नालेगाव येथील घटनास्थळी उपविभागिय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती व पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, परि.पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, सफौ.गिरोषकुमार केदार यांनी स्वतःअमरधाम येथे भेट दिली.या ठिकाणी पाहणी करुन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शना खाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकास बोलावुन त्यांची तीन टीम बनवून मृत नवजात बालकाचे नातेवाईकांचा शोध घेणे करीता मार्गदर्शन करून पोलिस पथकास रवाना केले.
दोन तासातच गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोकॉ/सुरज कदम व पोकॉ/सुजय हिवाळे यांनी सिव्हील हॉस्पिटल, येथे सदर मृत अभ्रकाच्या नातेवाईकांचा शिताफिने शोध घेतला.व लागलीच त्यांनी या बाबत पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना माहीती दिली.पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सदर मृत अभ्रकाचे वडील रेवन्ना सुखदेव शिंदे व नातेवाईक यांचे कडे विचारपुस केली असता तेव्हा सांगितले की,सदर अभ्रक हे सिव्हील हॉस्पीटल मध्ये जन्म घेण्यापुवीच मयत झाले होते.म्हणुन त्यास दफन करणे कामी त्यांचे नातेवाईक यांनी अमरधाम,नालेगाव,येथे घेवुन गेले असता तेथे त्यांना अनोळखी इसम भेटला व त्याने त्याचे नातेवाईकांना सांगितले की,मीच सदर ठिकाणी दफन विधी करत असतो.त्यानंतर त्यांची पत्नीला आय.सी.यु.मध्ये अॅडमिट करावयाचे असल्याने त्यांनी सदर अभ्रक हे सदर अनोळखी इसमाकडे विधीवत अंतविधी करणेस देवून निघुन गेले.
सदर घटनेची पडताळणी करुन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी प्रसांगवधान राखल्यामुळे यातील मयत अभ्रकाचे आई,वडील व नातेवाईकांवर गुन्हा दाखल न करता मुळ अनोळखी आरोपी इसमाचा शोध घेणे करीता पथक रवाना केले.तसेच कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर गुन्हा रजि नं ८७७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०१ प्रमाणे दाखल करुन पुढील तपास परि.पोसई सेदवाड यांना देण्यात आला.या घटनेतील मुळ आरोपी अर्जुन मुथ्थु स्वामी यास गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ/ विशाल दळवी,पोना/सलिम शेख,पोकॉ/अतुल काजळे,दिपक रोहकले,तानाजी पवार, सत्यम शिंदे,सुरज कदम, यांनी शोध घेवुन सीताफिने त्याला अटक केले.सदर कुटुंब हे अतिशय गरिब परिस्थीतीत असल्याने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व परि.पोसई कृष्णकुमार सेदवाड व सफौ.गिरीषकुमार केदार यांनी सदर मृत्त अर्भकाचा विधीवत अंत्यविधी त्यांचे नातेवाईकासमवेत केला. अंतविधीची करण्याची परीस्थीती नसनारे कुटुंबाला कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, परि.पोउनि संदवाड यांनी पोलीसातील देवमानुस दाखवुन दिला.तसेच पो.नि.प्रताप दराडे यांनी प्रसंगावधान राखून चुकीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल न होता परि. पोउनि सेदवाड यांचे करवी योग्य चौकशी करुन घेवुन मुळ आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करुन तसेच त्या कुटुंबाला त्यांचे बालकाचे विधीवत अंतविधी करुन एका सर्वसामान्य कुटुंबाला पोलीसातील देवमानूस दिसला अशी भावना त्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती,पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोउनि कृष्णकुमार सुधाकर सेदवाड, सफी.गिरीषकुमार केदार, पोहेको/विशाल दळवी, पोना/सलिम शेख,सुरज कदम,सुजय हिवाळे, अतुल काजळे,दिपक रोहकले,सत्यम,शिंदे तानाजी पवार यांनी केली आहे.