कालकथित प्रेमानंद रूपवते यांच्या ६ व्या स्मृतिदिना निम्मित घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत निर्मिती साळवे प्रथम
अहमदनगर (दि.३ ऑगस्ट):-अहमदनगर येथील दादासाहेब रूपवते विद्यालय व जुनिअर कॉलेज व प्रेम स्नेह परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कालकथित प्रेमानंद रूपवते यांच्या ६ व्या स्मृतिदिना निमित्त शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले होती.यामध्ये विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले होते.
“पर्यावरण संवर्धन” या विषयावर कुमारी निर्मिती संघर्ष साळवे इयत्ता ११ वी सायन्स हीने निरोगी व प्रदूषण मुक्त जीवन जगण्यासाठी आपण जवळच्या प्रवासासाठी ई-बाईक व सायकल वापरणे गरजेचे असून,निसर्ग जसा आहे तसाच ठेवला पाहिजे,आपली मर्जी जर निसर्गावर लादली तर आपले नुकसानच होईल असे मत व्यक्त केले.
तसेच “मी पंतप्रधान झालो/झाले तर” या विषयावर कुमारी जयश्री रिटे (द्वितीय) व निशांत साळवे (तृतीय) यांनीही आपले मत मांडले.सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.श्री. पी.बी.गीते व श्रीमती. खोसे मॅडम यांनी काम पाहिले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य एम.के. शेख हे होते.तसेच यावेळी प्रा.पी.एस. सूर्यवंशी,प्रा.एस.पी. कदम,प्रा.सुनील वाघमारे,प्रा.श्याम यादव आदी मान्यवर उपस्थित होते.