Maharashtra247

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या धडक कारवाया अवैध देशी विदेशी दारू जप्त ५ गुन्हे दाखल

 

अहमदनगर (दि.३ ऑगस्ट):-राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगर क्र.१ च्या भरारी पथकाकडून दि.१ ऑगस्ट रोजी अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाबा व हॉटेल चालकांवर कारवाई करण्यात आली.

यात नगर तालुक्यातील साकत,पुणे रोड बायपास,शेंडी बायपास,मनमाड रोड या ठिकाणी हॉटेल धाब्यांवर कारवाई करून एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.मोठ्या प्रमाणात अवैध देशी विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला आहे.

हि कारवाई श्री.प्रमोद सु.सोनोने, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जि.अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सुूरज कुसळे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. १ अहमदनगर,श्री.जी.टी.खोडे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग अहमदनगर,तसेच दुय्यम निरीक्षक अ विभाग श्री.उमेश ढोले,आनंद जावळे,अरुण खाडे,अजिनाथ झोळ,सीमा केसरकर व जवान संवर्गातील कर्मचारी यांनी केली आहे.

You cannot copy content of this page