अहमदनगर (दि.२ ऑगस्ट):-शहरातील बेपारी मोहल्ला झेंडीगेट येथील एका बंद वाडग्यातील कत्तलखान्यावर कोतवाली पोलीसांनी छापा टाकून १७ गोवंशीय जनावरांची सुटका करून ३ लाख १०,०००/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दि.०२ ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,शहरातील बेपारी मोहल्ला झेंडीगेट येथे एका बंद वाडग्यात काही गोवंशीय जनावरांना कत्तल करण्याकरीता डांबून ठेवले आहे व आत्ता छापा टाकल्यास मिळुन येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोनि/ प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांना त्या ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमीची खात्री केली असता आरोपी नामे कादर मुसा शेख (रा. निजाम गल्ली कोठला) याच्या कब्जात एकूण ३ लाख १०,०००/- रु.कि. च्या लहान मोठ्या आकाराच्या विवीध रंगाच्या गोवंशीय जातीच्या गाई,वासरे, बैल असे मिळुन आल्याने ते ताब्यात घेवुन गोवंशीय जनावरांचे योग्य प्रकारे निगा राखणे व चारा पाणी याची व्यवस्था होणे करीता त्यांना पांजरापोळ गोपालन संस्था अरणगांव येथे सुखरुप सोडले.
या कारवाईबाबत पोकाँ/ सतिष मारुती शिंदे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं /२०२४ BNS २०२३ चे कलम २७१ सह महा पशु संरक्षण अधिनियम कलम ५ (क), ९ (अ) तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागवयास प्रतिबंध अधि ११ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,गुन्हे शोध पथकाचे पोहेकाँ/योगेश भिंगारदिवे,/सतिष भांड,गणेश धोत्रे,विशाल दळवी,पोना/सलिम शेख,अविनाश वाकचौरे, पोकाँ/अमोल गाढे,अतुल काजळे,सतीश शिंदे, मपोहेकाँ/तोरडमल, पोकाँ/अभय कदम यांच्या पथकाने केली आहे.
