राहुरी (प्रतिनिधी):-डॉ.विखे पाटिल कृषी महाविद्यालयतर्फे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत राहुरी खुर्द गावात १ ऑगस्ट २०२४ रोजी भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे उपसरपंच श्री.तुकाराम बाचकर तर प्रमुख व्याख्याते म्हणुन महात्मा फुले कृषि विद्यापीठ कापुस सुधार प्रकल्पाचे सहाय्यक किटक शास्त्रज्ञ डॉ.नंदकुमार भुते होते.

तसेच कृषि सहाय्यक श्री.एस.एस.खोंडे हे उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणुन कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर धोंडे,राहुरी खुर्द गावाचे ग्रामपंचायत सदस्या सौ.आश्विनी कुमावत,सौ.मंगल शेडगे,श्री.अमोल डोळस,श्री.राम तोडमल,श्री. शिवाजी पवार,श्री.असफ पठाण तसेच ग्रामविकास अधिकारी श्री.प्रभाकर चव्हाण,तलाठी भाऊसाहेब तुषार काळे,कृषि सहाय्यक एस.एस.खोंडे,कृषि महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.के.एस दांगडे,प्रा.पी.सी ठोंबरे, प्रा.बी.व्ही.गायकवाड़ आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.नंदकुमार भुते यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
निसर्ग किडींचे संवर्धन करणे व जैविक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे.कामगंध,प्रकाश किटक,सापळे यांचे प्रात्याक्षिक दाखवून त्यांचा वापर कसा करावा,निंबोळी अर्क,दशपर्णी अर्क,गांडुळ खताचा अर्क,जिवामृत या सर्वांचा वापर करुन सेंद्रिय शेतीकडे वळण्यास मार्गदर्शन केले.राहुरी खुर्द गावचे कृषि सहाय्यक श्री.खोंडे यांनी कृषि विभागातील विविध योजनेची माहिती दिली तसेच तलाठी भाऊसाहेब तुषार काळे यांनी महसुल विभागान्या योजना व ई- पीक पाहणी बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कृषि महाविद्यालयाचे प्रा.एस. ए.मेघडंबर यांनी मृदा परिक्षण व जमिनीतील सुक्ष्म अन्नद्रव्य यांचे महत्व सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. तुकाराम बाचकर यांनी राहुरी खुर्द गावात कृषि महाविद्यालयाच्या कृषी दुतांनी केलेल्या कामाचे कौतुक केले,व त्यांना शुभेच्छा दिल्या.कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर धोंडे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पन वाढवावे. रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करुन सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे तसेच सेंद्रिय शेतीचे महत्व सांगितले.या कार्यक्रमासाठी गावाचे सरपंच सौ.मालतीताई साखरे, ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमाचे कार्यकक्रम अधिकारी पा.किरण दांगडे,प्रा.वी.व्ही. गायकवाड,प्रा.पुनम ठोंबरे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच या कार्याक्रमासाठी विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिदुत कु. विशाल वैरागर व आभार प्रदर्शन हर्षद राठोड यांनी केले.शेतकरी मेळावा यशस्वीतेसाठी कृषीदुत गणेश झरेकर,सुरज टेंगले, हर्षद राठोड विशाल वैरागर, उन्नती पवार यांनी परिश्रम घेतले.
