नळदुर्ग प्रतिनिधी (अजित चव्हाण):-तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे 43 कोटी 67 लाख रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे शुभारंभ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते नळदुर्ग येथील बोरी धरणातील पाण्याचे जलपूजन करून व अनेक भागातील पाणी पुरवठा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

त्यामुळे शहरवासीयांना आता दररोज पाणी मिळणार आहे.व पुढील टप्यात नळाद्वारे 24 तास पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे.नळदुर्ग येथे शासकीय जागेवर राहणाऱ्या कुटूंबाना घर जागेची नोंद न.प.दप्तरी घेवुन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्याना भोगवटदार नोंदणी प्रमाणात देण्यात आले. तसेच नळदुर्ग तालुका निर्मितीचा प्रश्न देखील मार्गी लावणार असून पहिल्या टप्प्यात अतिरिक्त अप्पर तहसील कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच शहरवासीयांना आनंदाची बातमी देण्यात येणार आहे.
महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.नळदुर्ग भुईकोट किल्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात त्या अनुषंगानेच शहरात महात्मा बसवेश्वर स्मारक,वसंतराव नाईक यांचे स्मारक,मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील शहीद बचित्तरसिंग यांच्या स्मारकाचेही काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी निधीची उपलब्धता देखील झाली आहे.होर्टी येथे 250 एकर जमिनीवर एमआयडीसी उभारली जाणार आहे.
तसेच नळदुर्ग शहरालगत नवीन एमआयडीसी साठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.यावेळी भाजप नेते सुशांत भूमकर,दीपक आलूरे,माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागीरदार,माजी नगरसेवक संजय बताले, बसवराज धरणे,सुधीर हजारे,विनायक अहंकारी,निरंजन राठोड, छमाबाई राठोड, भाजपचे शहराध्यक्ष धीमाजी घुगे,भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव श्रमिक पोतदार,माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके,सुनील बनसोडे, संजय जाधव,बंडू पुदाले, गणेश मोरडे,शिवाजी गायकवाड,बबन चौधरी, रियाज शेख,अक्षय भोई, सागर हजारी,यांच्यासह नळदुर्ग शहरातील हजारो नागरिक व भाजपाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
