वणी प्रतिनिधी (दि.१५ ऑगस्ट):-दलित एकल महिला व सामाजिक कार्यकर्त्यांची झटकीपट डॉलर (पैसे) कमावण्यासाठी युट्युबवर बदनामी करणाऱ्या ‘माधुरी टॉक शो’ या यूट्यूब चैनलवर बंदी आणून नाशिक येथील ‘त्या आरोपी महिलेस’ व तिच्या ‘साथीदारांना’ ताबडतोब अटक करण्यात यावी या मागणीसाठी दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी वणी तहसील येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

सदरील चैनलची प्रमुख आरोपी महिला ही दलित समाजातील महिलांचा खोट्या विषयात प्रचार प्रसार करत बदनामी करत व जातीवाचक बोलून अपमान करत आहे.या महिलेवर वणी येथील सामाजिक कार्यकर्त्या निशा गवई यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.परंतु या महिलेस अजूनही पोलिसांनी अटक केलेली नाही.
वेळोवेळी आंदोलने करून व पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करून देखील अजूनही न्याय मिळत नाहीये अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या निशा गवई यांनी यावेळी व्यक्त केली आहे.हे धरणे आंदोलन दामिनी दारूबंदी अभियानाच्या बीड येथील संयोजिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल,राधाताई सुरवसे सामाजिक कार्यकर्त्या बीड,काजल उर्फ निशा गवई राष्ट्रीय अपराध जांच आयोग भारत सरकार महाराष्ट्र प्रेसिडेंट क्राइम ब्रांच यांच्या नेतृत्वाखाली वणी तहसील कार्यालया समोर करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने महिला व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
