शेतातून तब्बल १० लाख रुपयांचे डाळिंब चोरणाऱ्या टोळीतील तिघे जेरबंद;चहाच्या टपरीवर एलसीबीने लावला असा सापळा
अहमदनगर (दि.१५ ऑगस्ट):-राहता तालुक्यातील लोणी मापारवाडी येथील शेतक-याच्या शेतातील तब्बल 10 लाखांचे डाळींब चोरी करणारे 3 आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकीगत अशी की,दि.29 जुलै, 2024 रोजी यातील फिर्यादी श्री..विजय शिवाजी मापारी (रा. मापारवाडी लोणी खु. ता.राहाता.जि.अहमदनगर) यांच्या 3 एकर शेतातील अंदाजे 14 टन वजनाचे 10,00,000/-लाख, रुपये किंमतीचे भगवा जातीचे डाळींबाचे पुर्णवाढ झालेले फळ अनोळखी चोरट्यांची चोरुन नेले बाबत लोणी पो.स्टे. येथे गु.र.नं. 443/2024 भारतीय न्याय संहीता कलम 303 (2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर, यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक नेमुन गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.पोलिस पथक लोणी,राहाता व शिर्डी परिसरात फिरुन रेकॉर्डवरील अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती घेत असताना पथकास नमुद गुन्हा हा इसम नामे आदीनाथ माळी (रा. धानोरा झरेकाठी,ता. संगमनेर) याने त्याचे इतर साथीदारांसह केला असुन तो त्याचे 2 साथीदारांसह (चिंचोली फाटा,ता.राहुरी) येथे चहाचे टपरीवर बसलेला आहे,आता गेल्यास मिळुन येईल.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने,पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी चिंचोली फाटा,ता.राहुरी येथे जावुन खात्री केली असता एका चहाच्या टपरीवर बातमीतील वर्णना प्रमाणे 3 इसम बसलेले दिसले.
पथकाची खात्री होताच तिन्ही संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आदीनाथ गोविंद माळी रा.धानोरा झरेकाठी, ता. संगमनेर,अमोल नामदेव पवार रा.म्हैसगांव,ता.राहुरी व आनंद संजय पवार रा.चिंचोली फाटा, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले.ताब्यातील संशयीतांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी त्यांचे इतर साथीदार नामे अविनाश सुभाष माळी (फरार), अजय जालींदर माळी (फरार),शंकर पवार (फरार) अ.क्र. 4 ते 6 रा.चिंचोली फाटा, ता. राहुरी,विकास काळे (फरार),पवन मधे (फरार),आकाश काळे (फरार) अ.क्र. 7 ते 9 रा.म्हैसगांव,ता.राहुरी व अवि गवळी (फरार) रा. गोदावरी वसाहत,ता. राहुरी अशांनी मिळुन मापारवाडी,लोणी येथील शेतक-याचे शेतातील डाळींबाचे बागेतील डाळींब चोरी केल्याचे सांगितल्याने ताब्यातील तिन्ही आरोपींना लोणी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्री.वैभव कलुभर्मे अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समाधान भाटेवाल,पोकॉ/प्रमोद जाधव,सागर ससाणे,आकाश काळे,मयुर गायकवाड,फुरकान शेख व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.