दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद;सपोनि.जगदीश मुलगिर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच फिरवली तपासाची चक्रे
अहमदनगर (दि.१५ ऑगस्ट):-दरोडयाच्या गुन्हयातील फरार आरोपी पकडण्यास भिंगार कॅम्प पोलीसांना यश आले आहे.
बातमीची हकीगत अशी की, दि.२२/०५/२०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास घटनेतील फिर्यादी व तीची बहिण अशा दोघी महिला त्यांचे मोपेड मोटारसायकलवरुन फेब्रीकेशन दुकानाच्या समोरुन घरी त्रिमुर्ती चौकाकडे जात असतांना अजित रामदास केकाण रा.भगवान बाबा चौक,सारसनगर व त्याचे साथीदार हे दोन मोटारसायकलवर ट्रिपल शीट येवून फिर्यादीचे मोपेडला आडवी गाडी लावुन आमच्याकडे वळून काय बघता असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटीकरुन फिर्यादीच्या गळयातील सोन्याचे मिनी गंठण हे बळजबरीने हिसकावुन घेतले लाथाबुक्याने लोखंडी रॉडने व लाकडी दांडक्याने दुखापत करून दरोडा टाकुन पळून गेले होते.
या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता.गुन्हा घडल्यापासुन अजित केकाण हा फरार झालेला होता.सदर गुन्हाचा तपास करताना भिंगार कॅम्प पो.स्टे.चे सहा.पोलीस निरीक्षक जगदिश मुलगिर यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील फरारी आरोपी अजित रामदास केकाण हा वाकोडी फाटयावर येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती सहा.पोलीस निरीक्षक जगदिश मुलगिर यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना नमुद ठिकाणी जावुन सापळा लावुन आरोपी ताब्यात घेण्याबाबत आदेशित केल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदार हे सदर ठिकाणी वाकोडी फाटा येथे गेले असता अजित केकाण हा तेथे काही वेळातच आला.
त्यास पोलीस आल्याची चाहुल लागताच तो पळून जाण्याचे तयारीत असतांना त्यास पथकाने जागीच ताब्यात घेतले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस आधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर,पोलीस अंमलदार कैलास सोनार,संदिप घोडके,रवींद्र टकले,दिपक शिंदे,प्रमोद लहारे,संदिप थोरात, कैलास शिरसाठ यांनी केली आहे.