आर्मीमध्ये नोकरीचे आमीष दाखवुन लोकांची फसवणूक करणा-या भामट्यास भिंगार कॅम्प पोलिसांनी केले जेरबंद
अहमदनगर (दि.१५ ऑगस्ट):-आर्मीमध्ये नोकरीचे आमीष दाखवुन लोकांची फसवणूक करणा-या भामट्यास भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले आहे.
बातमीची हकीगत अशी की, दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी मिलीटरी इंटेलिजन्स,अहमदनगर,दक्षिण कमान इंटेलिजन्स बटालियन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,सन २०२३ मध्ये इसम नामे विजय बीस्ट,सिव्हील डिफेन्स कुक, (रा.वाकोडी फाटा,ता.जि. अहमदनगर) याने आर्मी मध्ये सिव्हील डिफेन्स, एम.टी.एस.कुक,क्लर्क मध्ये भरती करतो.
माझी लष्करातील वरिष्ठ अधिका-यांशी ओळख आहे.असे म्हणुन फिर्यादीचा विश्वास संपादन करुन नोकरीस लावतो असे म्हणून दोन लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे.तसेच उत्तराखंड,पंजाब व अहमदनगर येथील सौरभ पटवाल,मयंक राऊत व लक्ष्मी थापा यांनाही नोकरीस लावुन देतो असे म्हणुन त्यांचे सर्वांकडुन एकुन ८ लाख ३०,०००/-रुपये घेऊन फसवणूक केली आहे.
तसेच सदर उमेदवारांची अहमदनगर येथील आनंदऋषिजी हॉस्पीटलमध्ये बनावट वैद्यकीय तपासणी केली.या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास करताना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पो.स्टे.गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी तसेच मिलीटरी इंटेलिजन्स यांनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याचे कडे गुन्ह्याचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
तसेच तो लष्कर व संरक्षणाच्या नागरी रोजगारासाठी फसव्या भरती रॅकेटमध्ये सामील होता.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागील पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकातील पोहेकॉ/ संदिप घोडके,पोहेकॉ/दिपक शिंदे,पोहेकॉ/रवि टकले,पोहेकॉ/मिसाळ, पोकॉ/प्रमोद लहारे यांनी केली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/ मिसाळ हे करीत आहेत.