१ सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे महाअधिवेशन
नगर प्रतिनिधी (१६ ऑगस्ट):-पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या वतीने महाअधिवेशनाची तयारी सुरू आहे.अहमदनगर येथे महाअधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी पदाधिकारी आले असता पद्मशाली पंच कमिटी ज्ञाती समाज व श्री मार्कंडेय देवस्थानं कमिटीचे वतीने पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवक संघमचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर गुडेल्ली यांचा पंच कमिटी चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व देवस्थान चे अध्यक्ष गणेश विदये यांचे हस्ते व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे उपाध्यक्ष दत्तात्रय रासकोंडा यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
या वेळी पंच कमिटी चे माजी अध्यक्ष संजय वल्लाकट्टी,विश्वस्त ॲड.राजू गाली,श्रीनिवास रासकोंडा उपस्थीत होते.या वेळी पश्चिम महाराष्ट्र संघंम चे सचिव दयानंद मामड्याल, युवजन संघमचे सचिव योगेश मार्गम,नगरसेवक शशिकांत केंची यांचा ही सन्मान करण्यात आला.
या वेळी माजी नगरसेवक शशिकांत केंची यांनी सर्व नगर शहरातील समाज बंधू भगिनी यांना पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली ज्ञाती संस्थेचे महा अधिवेशन दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित केले असल्याने अधिवेशनाचे आमंत्रण दिले.
या वेळी दत्तात्रय रसकोंडा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, पद्मशाली समाज नगर मधे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून जास्तीत जास्त समाज अधिवेशनाला आणण्याचा प्रयत्न करू.
या वेळी श्रीनिवास बोज्जा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, सध्याच्या काळात समाजाला आरक्षणाची गरज असून या साठी समाज संघटित होणे गरजेचे असून या साठी अधिवेशनाला समाज जास्तीत जास्त संख्येने अधिवेशनाला उपस्थीत राहावे असे आवाहन केले.
उपस्थितांचे स्वागत संजय वल्लाकट्टी यांनी केले तर आभार श्रीनिवास रासकोंडा यांनी मानले. सुत्रसंचालन ऍड.राजू गाली यांनी केले.