अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने मनपा कर्मचाऱ्यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा
अहमदनगर (दि.३० ऑगस्ट):-अहमदनगर महानगरपालिकेतिल सर्व पात्र कामगार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग शिफारशी लागू करण्याबाबत महासभेतील क्रमांक १२ दि.१६/७/२०१९ रोजी ठराव संमत करून देखील आज पर्यंत महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या नाहीत.
महानगरपालिका प्रशासनाने कोणती दखल न घेतल्यामुळे या बाबत कामगार कर्मचारी यांचे महानगरपालिका प्रवेशद्वारा जवळ सातवा वेतन आयोग व विविध मागण्यांसाठी चाललेले आमरण उपोषणास अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे.
व पुढील अटी मंजूर होईपर्यंत अखिल भारतीय मेहतर समाज संघटना कर्मचारी यांच्या पाठीशी उभा राहील.प्रशासनाने म.न.पा कर्मचारी-कामगार यांच्या मांगणी त्वरित पूर्ण करावे अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.असे लेखी पत्र अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने म.न.पा कामगार युनियनचे शिष्टमंडळ यांना देण्यात आले.या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनिभैय्या खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा उपसचिव शुभम टाक, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन चव्हाण,अनिल वाणे,तालेवार गोहेर,विकास पंडित,दिलीप सुर्यवंशी,व आदी पदाधिकारी उपस्थित होते.