मनसे शहराध्यक्षा अक्षराताई घोडके यांचा एक कॉल हॉस्पिटल प्रशासन खडबडून जागे..
नाशिक प्रतिनिधी:-नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात मनमाड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रवी नायर यांच्या भगिनी यांचा नाशिक येथे गाडीवरून पडल्यामुळे मोठा अपघात झाला होता.
त्यांना येथील जयराम हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले.त्यांना डोक्याला नऊ टाके पडले होते.दवाखान्यात तीन दिवसाचे बिल येथील डॉक्टरांनी तब्बल ६५ हजार इतके काढले होते.परंतु पेशंटची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांची एवढे बिल भरण्याची परिस्थिती नव्हती व इतके बिल झाले कसे असाही प्रश्न निर्माण झाला होता.
पेशंटचे बंधू तथा मनसेचे सदस्य रवी नायर यांनी मनसेचे मनमाड शहराध्यक्ष सचिन शिरुड यांच्याशी संपर्क करून त्यांना याबाबत माहिती दिली.शिरूड यांनी तत्काळ नाशिक येथील मनसे महिला शहराध्यक्षा अक्षराताई घोडके यांच्याशी संपर्क केला व हॉस्पिटलच्या वाढीव बिला बाबत माहिती दिली तात्काळ मनसे नेत्या अक्षराताई घोडके यांनी याची दखल घेऊन त्या हॉस्पिटल प्रशासनाला फोन लावून वाढीव बीला बाबत विचारणा केली व पेशंटची जी सत्य परिस्थिती आहे ती सांगितली.
डॉक्टरांनी अक्षराताई घोडके यांच्या विनंतीला मान देऊन व पेशंटची परिस्थिती पाहून त्यांना ६५ हजार रुपये बिलाच्या ऐवजी फक्त ३० हजार रुपये भरायला सांगितले.नायर परिवाराने अक्षराताई घोडके यांचे व सचिन शिरूड यांचे आभार मानले.अक्षराताई या अशा अनेक विविध समाजकार्याने,लोकांच्या मदतीला धावून जाणे याने नाशिक मध्ये प्रसिद्ध आहेत.कोणताही जातीभेद न पाळता सर्व मनुष्य समान आहे त्यामुळे एकमेकांची मदत केलीच पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणुसकी म्हणून समाजकार्य केले पाहिजे असे मनसे शहराध्यक्षा अक्षराताई घोडके यावेळी म्हणाल्या.