अखेर मनपा सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सोडले उपोषण मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
अहमदनगर (दि.३ सप्टेंबर):-गेल्या ८ दिवसांपासून सातवा वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी महापालिका कर्मचार्यांनी उपोषण सुरु केले होते.मनपा कर्मचार्यांच्या प्रश्नाची आमदार संग्राम जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत कर्मचार्यांच्या सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत ठाण मांडले.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना भेटून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला आहे.मंगळवारी उशिरा प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे यांची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. तसेच आमदार जगताप यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले.गेल्या आठ वर्षापासून महापालिका कर्मचार्यांनी सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी लढा उभारला आहे. त्यासाठी अनेक वेळा शासनाला पत्र व्यवहार केला.
निवेदने दिली.पाठपुरावाही केला.दरम्यानच्या काळात महापालिका कर्मचार्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये कर्मचार्यांनी लाँग मार्चही काढला होता.परंतु,त्यानंतर सरकार दरबारी बैठका होऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने महापालिका कर्मचारी बाबासाहेब मुदगल,जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर यांनी उपोषण सुरु केले आहे. उपोषणाला महापालिका स्वच्छता कर्मचार्यांनी कामकाज बंद ठेवून पाठिंबा दिला होता. दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. लाईट, पाणी, स्वच्छता, साफसफाई बंद ठेवण्याचा इशारा कर्मचार्यांनी दिला होता.दरम्यान, महापालिका कर्मचार्यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत ठाण मांडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महापालिका कर्मचार्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला.
मंगळवारी उशिरा मनपा कर्मचार्यांच्या सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. तसेच उपोषणकर्त्यांची भेट घेत सविस्तर माहिती दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आमदार जगताप यांच्या हस्ते उपोषण सोडले. दरम्यान,महापालिका कर्मचार्यांच्या सातवा वेतन आयोगाचा प्रश्न आ.जगताप यांनी मार्गी लावल्याने महापालिका कर्मचार्यांनी आ. जगताप यांचे आभार मानले मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.