Maharashtra247

कत्तलीसाठी आणलेल्या तब्बल ६६ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका शहर वाहतूक शाखा व तोफखाना पोलिसांची संयुक्त कारवाई

 

अहमदनगर (दि.४ सप्टेंबर):-नगर शहरामध्ये शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत शहरातील वाहतुकीचे नियमन व नाकाबंदी करणेकामी विविध चौकात पोलीस अधिकारी व अमलदार नेमलेले असतात.दि.०४ सप्टेंबर २०२४ रोजी शहर वाहतुक शाखे मार्फत कोठला स्टॅण्ड या ठिकाणी नाकाबंदी असताना असता शहर वाहतूक शाखेचे पोनि/ बाबासाहेब बोरसे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,नगर शहरातील कोठला,मंगलगेट या ठिकाणी गोवंश जातीची जनावरे कत्तल करुन मांस विक्री करण्याचे उद्देशाने जनावरांना मालवाहतुक वाहनातुन डांबुन ठेवुन चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता छ.संभाजीनगर रोडने घेवुन येत आहेत.

अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोनि/ बोरसे यांनी ड्युटीवर असलेल्या अंमलदार यांना तात्काळ कारवाई करण्यास सांगितले.अंमलदार यांना शिरूर बाजू कडून कोठला स्टेॅण्डचे दिशेने येणारी चार संशयित मालवाहतुक वाहने दिसली.सदर वाहने थांबवुन चौकशी केली असता त्यांनी उडवा उडविची उत्तरे दिल्याने वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये ५ काळया रंगाच्या जर्शी गायी,गोवंश जातीची ६१ लहान-मोठी जर्शी वासरे मिळुन आली.सदर वाहन चालकांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे वसीम इसाक सय्यद, आतिक लतीफ कुरेशी,सुलतान एनुद्दीन कुरेशी,जमील अब्दुल सय्यद सांगितले.सदरील इसमांकडुन एकूण ११ लाख ४६,०০०/-रु.एवढा मुद्देमाल पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त करण्यात आला असुन त्यांचे विरुद्ध सफौ/मन्सुर सय्यद यानी तोफखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम.११,महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(ब),९ मोटारवाहन कायदा कलम.६६(१),१९२,१५८/१७७ प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोहवा/व्ही.सी.गंगावणे तोफखाना पोलीस ठाणे हे करित आहेत.

सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोसई/शमूवेल गायकवाड,सफौ/मन्सुर सय्यद,पोकॉ/युवराज गव्हाणे,पोशि/मधुकर ससे,चापोशि/अतुल लगड तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोहवा/ विनोद गंगावणे,पोहवा/दिपक जाधव,पोकॉ/सचिन बाचकर,पोकॉ/सावळेराम क्षिरसागर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page