कांदा मार्केट येथे व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करून ५० लाख लुटणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या
अहमदनगर (दि.१० सप्टेंबर):-नेप्ती बायपास रोडवरील कांदा मार्केट जवळ ५० लाख रूपये लुटून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणारे 5 आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत 20 लाख रूपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
बातमीची हकिगत अशी की यातील फिर्यादी श्री.शोएब अन्वर सय्यद (धंदा कांदा व्यापारी,रा.हाजी इब्राहिम बिल्डींग,स्टेशन रोड,अहमदनगर) हे व त्यांचा भाऊ समीर सय्यद हे दि.07 सप्टेंबर 2024 रोजी त्यांच्या टोयॅटो ग्लांझा कारने नेप्ती कांदा मार्केट येथे कांदा लिलावा करीता घरून पैसे घेऊन जात असताना हॉटेल राजनंदिनी समोर यातील अज्ञात आरोपीतांनी फिर्यादीच्या कारला धडक देऊन,गाडी आडवून कोयत्याने व लोखंडी रॉडने कारच्या काचा फोडुन,फिर्यादी व त्याचा भाऊ यांचेवर कोयत्याने वार करून, फिर्यादी कडील 50 लाख रूपये रक्कम बळजबरीने हिसकावून चोरुन घेऊन गेले होते.
या घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुरनं 985/2024 भा.न्या.सं.2023 चे कलम 310 (2), 311, 324 (4),शस्त्र अधिनियम 4/25 प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना सदर दरोडयाचा गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी गुन्हा घडल्या ठिकाणी भेट देऊन,गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/ तुषार धाकराव,पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे,अतुल लोटके, फुरकान शेख,प्रशांत राठोड,रविंद्र घुंगासे, सागर ससाणे,अमृत आढाव,शरद बुधवंत, संतोष खैरे,शिवाजी ढाकणे,विशाल तनपुरे,सोमनाथ झांबरे,किशोर शिरसाठ,प्रमोद जाधव, अरूण मोरे अशांचे पथक नेमुण वर नमुद गुन्ह्याचा आरोपी यांचा शोध घेणेबाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने घटना ठिकाणी भेट देवुन, साक्षीदाराकडे विचारपुस करून,तपास पथकाने घटना ठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही.फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपासामध्ये दोन इसम युनिकॉर्न मोटार सायकलवर फिर्यादीचा पाठलाग करत असल्याचे दिसुन आले. तपासामध्ये सदरचा गुन्हा हा तांत्रिक विश्लेषणावरुन नागेश संजय चव्हाण,(रा.मोमीन आखाडा ता.राहुरी, जि.अहमदनगर) याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हयाचे तपासात निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना पोनि/ दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडुन गुन्हयातील आरोपी हे चोरी केलेल्या पैशाचे वाटप करण्यासाठी विळद घाट परिसरातील जाणाई तलाव येथे येणार आहेत.अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांना खात्री करुन आरोपी ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने जाणाई तलावाजवळ येथे जाऊन खात्री केली असता तेथे एक ॲपे रिक्षा,दोन मोटार सायकलसह 9 ते 10 इसम बसलेले व उभे असलेले दिसले.पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयीत इसम पोलीस पथकास पाहुन पळून जाऊ लागले.
पथकाने त्यापैकी 5 इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मुबारक गणीभाई आत्तार रा.मुकूंदनगर, ता.अहमदनगर (रिक्षाचालक व हमाल),सुनिल छबु माळी रा.बारागाव नांदुर,ता.राहुरी (हमाल),अक्षय आण्णा बाचकर रा.गडदे आखाडा,ता.राहुरी (हमाल),मयुर उर्फ भैय्या आनंथा गायकवाड, रा.राहुरी खुर्द,ता.राहुरी,मनोज सुंदर शिरसाठ रा.राहुरी खुर्द ता.राहुरी, जि.अहमदनगर असे सांगीतले.त्यांचे कडे वर नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे पळून गेलेले साथीदार नागेश संजय चव्हाण,रा.मोमीन आखाडा,ता.राहुरी (फरार),अक्षय गोपाळे, रा.बारागाव नांदुर ता.राहुरी (फरार),सागर चव्हाण (घिसाडी), रा.मल्हारवाडी रोड पाटाजवळ,ता.राहुरी (फरार),अक्षय छबु साळवे,रा.राहुरी खुर्द, ता.राहुरी (फरार),अंकुश नामदेव पवार,रा.प्रगती शाळे समोर,भिलाटी, ता.राहुरी यांचे सह कट रचुन पाळत ठेवुन गुन्हा केल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीकडून 20,50,000/- रूपये रोख रक्कम, व 5,00,000/- रूपये किंमतीचे वाहन व मोबाईल असा एकुण 25,50,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी गुन्हयांतील आरोपी नागेश संजय चव्हाण व मुबारक गणीभाई आत्तार हे दोघे हमालीचे काम करतात.त्यामुळे त्या दोघात ओळख आहे.मुबारक आत्तार हे यातील फिर्यादी यांचे कडे यापुर्वी कामास असताना फिर्यादी व मुबारक यांचे मध्ये वाद झाल्याने मुबारक यास कामावरून काढुन टाकले होते.मुबारक याने नागेश चव्हाण यास सांगीतले की,तुम्ही जर फिर्यादीस लुटले तर खुप पैसे भेटतील त्याचे कडे खुप पैसे असतात.यावरून मुबारक व नागेश चव्हाण यांनी गुन्हयांचा प्लॅन तयार केला. त्यानंतर आरोपींनी अहदमनगर येथे येऊन, रेकी करून,फिर्यादीचे घर व कांदा मार्केट जाण्याचा रस्ता पाहुन गेले.मयुर गायकवाड व अक्षय बाचकर असे युनिकॉर्न मोटार सायकलवर इंपीरिअल चौक येथे थांबुन फिर्यादी निघाल्या नंतरची माहिती इतर साथीदारांना दिली व फिर्यादीचा वाहनाचा पाठलाग केला. त्यानुसार केडगाव परिसरात शाईन मोटार सायकलवर सुनिल माळी व अक्षय साळवे व केडगाव बायपास जवळ स्विफ्ट कारमध्ये नागेश चव्हाण,अक्षय गोपाळे, सागर चव्हाण,मनोज शिरसाठ अशांनी थांबुन फिर्यादीची गाडी केडगाव बायपास येथे आल्यावर,सदर गाडीचा पाठलाग करून हॉटेल राजनंदिनी समोर गाडी आडवून फिर्यादी व त्याचा भाऊ समीर सय्यद यांना कोयत्याने मारहाण करून,कारच्या काचा फोडून फिर्यादी कडील 50 लाख रूपये रक्कम बळजबरीने हिसकावून घेतले. ताब्यातील आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 844/2024 भा.न्या.सं.2023 चे कलम 310 (2), 311, 324 (4),शस्त्र अधिनियम 4/25 या गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग,श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.