राहुरीच्या नायब तहसीलदार संध्या दळवींचे शिवपाणंद शेतरस्त्यांचे परिपत्र राज्याला दिशादर्शक ठरणारे-शरद पवळे;तहसिलदारांचा सन्मान करत ऐतिहासिक निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत
अहमदनगर (दि.१३ सप्टेंबर):-पिढ्यान पिढ्या शेतकऱ्यांचा शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत मिळत असून जिल्हा तहसील कार्यालयात शेतरस्त्या संबंधात गांभीर्य निर्माण करत गावोगावचे शेतकरी चळवळीत सहभागी होत असून या आंदोलनाला न्यायालयीन प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची शेतरस्त्यांसाठी होणारी हेळसांड थांबवण्यासाठी विविध सामाजिक संघटनाअन्नदात्याच्या पाठीशी उभे राहत आहे.
त्यातच राहुरी तालुक्यातील शासकीय विश्रामगृहावर शेतकऱ्यांच्या नियोजित बैठकीत राजव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले यावेळी राहुरी शिव पानंद शेतरस्ता कृती समितीची स्थापना करण्यात आली त्यानंतर राहुरी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढत प्रशासनाला शेतरस्त्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या त्याच बरोबर प्रत्येक बुधवारी शेतरस्त्यांठी जनन्याम दिन सुरू करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या दालनात तहसीलदारांचा सत्कार करून सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,राजेंद्र देठे,नाथाभाऊ शिंदे,सचिन शेळके,सुनील भालके,विजय हापसे,योगेंद्र बांद्रे,विश्वजीत महाडिक,हरिभाऊ गाडे,प्रशांत कारले,अनिल कदम,किशोर वैद्य,राजेंद्र भांड, गोकुळदास आढाव,सोमनाथ भंगड,श्यामन शेख,रामकृष्ण जगताप,संतोष आडसुरे,सोळुंके बाळासाहेब सोळुंके,आकिल शेख आदी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने जनजागृती जनआंदोलन न्यायालयीन लढयाला बळ देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांच्या व्यथा समजून घेत प्रशासकीय पदाला योग्य न्याय देणाऱ्या राहुरीच्या नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी काढलेले परिपत्रक शेतकऱ्यांच मन जिंकणार असुन लवकरच त्यांची तहसिलदार पदी पद्दोन्नती व्हावी असे आशिर्वाद समस्त शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांनी देत इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा असे महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी म्हटले आहे.