अहमदनगर (दि.१३ सप्टेंबर):-स्टेयर्स फाउंडेशन यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यात शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.दि.१२ सप्टेंबर रोजी हॉटेल सिंग रेसिडेन्सी इथे स्टेयर्स फाउंडेशन,अहमदनगर यांची या बाबतची पहिली बैठक अतिशय उत्साहात पार पडली. बैठकीचा उद्देश हा होता की,अहमदनगर जिल्ह्याला फुटबॉलचा असलेला वारसा पुढे चालवणे,याबैठकीत सर्वानुमताने पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
अध्यक्षस्थानी विजू सुब्रमण्यम कमलात यांची निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रताप पटारे व श्री विन्सेंट फिलिप्स यांची नियुक्ती करण्यात आली.संस्थेचे सचिव म्हणून प्रसाद पाटोळे व सुभाष कनोजिया यांची नियुक्ती झाली.तर खजिनदार म्हणून मयूर टेकम यांची निवड करण्यात आली.
सदस्य म्हणून ॲड.निलेश हराळे,राहुल जोशी,वृषाली पटेकर, जावेद शेख यांची निवड करण्यात आली.या बैठकीत पुढील महिन्यात दि.३ ते ६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क या ठिकाणी करण्यात येणार आहे असे बैठकीत ठरले असून,त्या संदर्भातील सर्व बाबींची चर्चा करून निर्णय घेण्यात आले.बैठकीत उपस्थित मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला.या बैठकीला अहमदनगर मधील माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू तथा पंडित नेहरू हिंदी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गोपीचंद परदेशी सर,राष्ट्रीय कबड्डी पंच बळीराम सातपुते सर,संदीप दरंदले सर,प्रशांत पाटोळे,जॉय जोसेफ सर,तोहीद सर,सनी मनोदिया,अक्षय नायडू सर,सुहास कारंडे सर व सर्व शाळेचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
तसेच श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल व जूनियर कॉलेज यांच्या प्राचार्य तनुजा रणमोडे याही यावेळी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया मल्होत्रा यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषी कनोजिया,विशाल गायकवाड,अर्जुन खेकडे,प्रणव पंडित यांनी सहकार्य केले.