उद्योजक सुदाम ढेमरे यांच्या घरी मोठ्या उत्साहात गौराईंचे आगमन
अहमदनगर (दि.१३ सप्टेंबर):-भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर तसेच गणेश स्थापनेच्या तिसऱ्या दिवशी गौरींचं घरोघरी आगमन होतं.गौरी माहेरी येते त्यामुळे गौरी येतात त्या दिवशी तिचं स्वागत केलं जातं.दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन करण्यात येतं.
पहिल्या दिवशी ज्येष्ठागौरींना भाजी-भाकरीचा नैवेद्य केला जातो. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठागौरींसाठी पंचपक्वानांचा स्वयंपाक केला जातो.या दिवशी सोळा भाज्या,खीर, गोडाचे पदार्थ,वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी,लाडू,चकल्या,करंजी असे विविध पदार्थ तयार केले जातात.गौरींच्या आगमनाने घरात उत्साहाचे वातावरण पहायला मिळते.नगर शहरातील शिवनगर सावेडी येथील उद्योजक सुदाम ढेमरे यांच्या घरी मोठ्या उत्साहात गौराईंचे आगमन झाले.
यावेळी गौराइंचा यथोचित सोपस्कार ढेमरे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले.यावेळी या गौराईंच्या समोर आकर्षक सजावटी सह केदारनाथ मंदिराचा देखावा सादर करण्यात आले होते.यावेळी देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिला व पुरुषांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.