देशभरात बनावट सैन्य अधिकारी भरती रैकेट अखेर उध्वस्त भिंगार कॅम्प पोलिस व दक्षिण कमान मिलीटरी इंटेलिजन्स पुणे यांना यश
अहमदनगर (दि.१२ सप्टेंबर):-देशभरात बनावट सैन्य अधिकारी भरती रैकेट चालविणारा अरोपीस जेरबंद करण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना व दक्षिण कमान मिलीटरी इंटेलिजन्स पुणे यांना यश आले आहे.
दि.६/२/२०२२ पासून ते दि.२८/५/२०२२ पर्यंत आर्मी कॅम्प मुठी चौक जामखेड रोड, अहमदनगर येथे आरोपी नामे १)सत्यजित भरत कांबळे रा.श्रीगोंदा,जि.अहमदनगर २)बापु छबू आव्हाड:रा.आंबेगाव, पो.पाचोरा,ता.येवला,जि.नाशिक ३)राहूल सुमंत गुरव रा.चौसाळा,जि.बीड यांनी संगणमत करून फिर्यादी नामे भगवान काशिनाथ घुगे,रा.पास्ते,ता.सिन्नर जि.नाशिक व इतर शेकड़ो भारतीय सैन्य दलात भरतीची तयारी करणा-या युवकांना आम्ही आर्मी मध्ये मेजर पदावर नोकरीस आहे.असे भासवून तसेच वरील नमुद आरोपीतांनी अर्मीचा गणवेश परीधान करून तिचा गैरवापर करून आम्ही तुम्हाला आर्मीमध्ये नोकरी लावून देतो असे महाराष्ट्र,तेलंगणा,कर्नाटक,उत्तर प्रदेश,बिहार,पंजाब,हरीयाणा व नवी दिल्ली व येथील युवकांना संपर्क करुन त्यांना विविध ठिकाणी बनावट ट्रेनिंग सेंटर येथे बोलवुन त्यांना देवुन त्यांचे कडून वेळोवेळी रोख रक्कम व आरटीजिएस ऑनलाईन स्वरूपात रक्कम घेवुन फसवणुक केली आहे.
या बाबत भिंगार किंम्प पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.६६४/२०२४ भादविक ४२०,४६८, ४७५,४६५,४१७,१७१ (अ),३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्याने कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरी.जगदिश मुलगीर यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार करून गोपनिय माहीती च्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी सत्यजित भरत कांबळेरा.श्रीगोंदा,जि.अहमदनगर हा दिल्ली येथे रहात असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस अधिक्षक यांचे आदेशाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस पथक व दक्षिणी कमान मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांनी संयुक्त कारवाई करुन,बातमीतील आरोपी नामे सत्यजीत भरत कांबळे याचा शोध दिल्ली येथे जावून घेतला असता आरोपीस पोलीस आल्याचा सुगावा लागताच तो दिल्ली येथुन पळुन महाराष्ट्र गेला असल्याची माहीती तांत्रिक विश्लेषनादवारे मिळाल्याने आरोपी याला बेलापूर,ता.श्रीरामपुर,जिल्हा अहमदनगर येथे सापळा रचुन तो पळुन जाण्याच्या तयारीत असतांना त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
त्याचेकडे विचारपुस करता त्याने गुन्हयाची कबुली देवुन मी व माझे इतर साथिदार मित्र यांनी भारतीय सैन्य दल व मिलीटरी इंजिनिअरिंग सर्विसेस येथे अधिकारी म्हणुन भरती करुन देतो असे म्हणुन शेकड़ो युवकांकडुन प्रत्येकी ७ ते ८ लाख रुपये घेतले आहे यामध्ये महिला दलाल देखील सामिल असण्याची शक्यता आहे.तसेच भारतातील विविध राज्य महाराष्ट्र, तेलंगणा,कर्नाटक,उत्तर प्रदेश,बिहार,पंजाब,हरीयाणा व नवी दिल्ली येथील भरतीपूर्व प्रशिक्षण सेंटर यांचेशी संपर्क करून युवकांना देहराडुन व अहमदनगर येथील आर्मी परीसरात बोलावून युवकांना प्रशिक्षण देतो.व पैसे देण्या-या उमेदवारांना सेना दलातील मुख्य अभियंता अधिकारी आणि सेवानिवृत्त दक्षिणी कमान मुख्य अधिकारी यांचे कडील बनावट नियुक्ती पत्र देत असे अशी माहिती दिल्याने आरोपीस ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असुन पुढील तपास सहा.पो.निरी.जगदिश मुलगीर यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप. निरी.उमेश पतंगे हे करीत आहे.सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी.जगदिश मुलगीर यांच्या सूचनेनुसार पो.उप/ निरी.उमेश पतंगे,पोहेकॉं/संदीप घोडके,दिपक शिंदे,रवि टकले,पोकॉ/प्रमोद लहारे,समीर शेख,दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ/नितीन शिंदे,पोकॉ/राहुल गुंडू व दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांनी संयुक्त कारवाई केलेली आहे.