इंजि.यश शहा यांचा अहमदनगर सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने सत्कार;यश शहा हे कमी वयात चांगले सामाजिक कार्य करत आहेत अध्यक्ष पै.शिवाजी चव्हाण
अहमदनगर (दि.१५ सप्टेंबर):-अभियंता दिनाचे औचित्य साधत इंजिनीयर यश प्रमोद शहा यांचा आर्किटेक इंजिनियर्स सर्वेअर्स असोसिएशन संचालक पदी प्रथम पसंतीच्या सर्वात जास्त भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल तसेच शहा यांची सामाजिक कार्याची दखल घेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्वतःभगवान महावीर 2550 निर्वाण कल्याणक महोत्सव महाराष्ट्र शासन अहमदनगर जिल्हा समितीवर निवड केली.
या दोन्ही निवडी बद्दल शहा यांचा अहमदनगर सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशन व कामधेनु गौ संवर्धन गोशाळा या दोन्हींच्या वतीने अध्यक्ष पै.शिवाभाऊ चव्हाण व सर्व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यश शहा यांचा पार्श्वनाथ कन्स्ट्रक्शन्स अँड इंटेरियर्स नावाने बांधकाम व्यवसाय आहे.
सत्कार प्रसंगी पै.शिवाजी चव्हाण यांनी यश शहा हे कमी वयात चांगले सामाजिक कार्य करत असल्याचे सांगितले.तसेच व्यापारी बांधवांचे प्रश्न सरकारी स्तरावर शहा नेहमीच प्रभावीपणे मांडत असतात.तसेच सावेडी उपनगर असोसिएशनच्या वतीने व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक कार्यक्रम सोबतच वर्षभर अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात असे अध्यक्ष म्हणाले.
शहा यांनी सत्कार प्रसंगी सर्व असोसिएशनचे धन्यवाद मानले व सर्व अ.नगरकरांना सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आवाहन केले की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण सर्वांनी आपली खरेदी ही ऑनलाईन न करता प्रत्यक्ष दुकानात जाऊनच करावी.यावेळीअध्यक्ष शिवाजी चव्हाण,सचिव प्रमोद डोळसे,उपाध्यक्ष पाऊलबुद्धे,संचालक सचिन बाफना,यश गांधी,रावसाहेब चव्हाण,बोरुडे,गुंजाळ व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.