डाॅ.हरिष वाघमारे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित
भेंडा (विठ्ठल आंधळे):-छत्रपती संभाजीनगर येथील पहाट फाऊंडेशन तर्फे दरवर्षी समाजकार्य, पत्रकारिता,शैक्षणिक,युवा उद्योजक,क्रीडा, साहित्य,कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजणांना पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
त्या अनुषंगाने साहित्य क्षेत्रातील लेख,कथा,कविता,चारोळी उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन भेंडे येथील डाॅ.हरिष रामदास वाघमारे यांना यंदाच्या साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे १४ सप्टेंबर रोजी नांदापूरकर सभागृह,मराठवाडा साहित्य परिषद,पैठण गेट येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात चैत्राम पवार,डॉ. जीवन राजपूत,मारुती म्हस्के आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थीना सन्मानपत्र, मानाचा फेटा व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला कवी दंगलकार नितीन चंदनशिवे,डॉ.पी.एम. शहापूरकर,प्रा.रमेश गावित दिलीप शिखरे,संचालिका अर्पिता सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.आजपर्यंत त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.