Maharashtra247

गणपती विसर्जनानंतर पोलिसाचा तीव्र हृदयरोगाच्या झटक्याने मृत्यू पोलीस दलावर शोककळा

 

अहमदनगर (दि.१६ सप्टेंबर):-अहमदनगर पोलीस दलात कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलावर शोककाळा पसरली आहे.

कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले ज्ञानेश्वर मोरे हे हसतमुख असलेला कर्मचारी अनेकांच्या मदतीला धावणारा आणि संपूर्ण पोलीस दलात आपल्या हसतमुख चेहऱ्याने सर्वांना आपलेसे करणारा ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे यांचे निधन सर्वांना मनाला चटका लावून गेला आहे.

आज तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत ज्ञानेश्वर मोरे यांनी मराठी चित्रपट गाण्यावर भन्नाट डान्स करत सर्वांची वाहवा मिळवली होती गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर बप्पा मोरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले त्यांच्यावर उद्या सकाळी भिंगार येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

You cannot copy content of this page