Maharashtra247

महानगरपालिकेच्या स्वच्छता ‘ही’ सेवा अभियानाचा बुधवारी १८ सप्टेंबर रोजी शुभारंभ

 

अहमदनगर (दि.१६ प्रतिनिधी):-केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंतीदिन स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो.

या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता मोहीम,जनजागृतीपर कार्यक्रम,शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता,निबंध,घोषवाक्य,चित्रकला स्पर्धा,सफाई मित्र सुरक्षा शिबिर, वृक्षारोपण,सायकल स्पर्धा,प्लॉगीथॉन,सफाई कामगारांचा सन्मान अशा विविध उपक्रमाचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

या अभियानाचा शुभारंभ बुधवार १८ सप्टेंबर रोजी सकाळी न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.दुनियादारी फेम अभिनेत्री उर्मिला कानेटकर,आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे,जिल्हा मराठा प्रसारक संस्थेचे विश्वस्त रामचंद्र दरे, ॲड.विश्वास आठरे,न्यू आर्टस् कॉमर्स ऄँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब सागडे व रेसिडेन्सीअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे आदी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमात स्वच्छतेच्या जनजागृती साठी तयार केलेल्या जींगलचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी स्वच्छ्ता जनजगृतीपर पथनाट्य व ‘एक पेड मा के नाम’ उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.या सर्व उपक्रमात शहरातील नागरिक,शाळा,सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महानगरपालिका कर्मचारी सहभागी होणार आहेत.नागरिकांनीही या कार्यक्रमास उपस्थित रहावे,असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page