राज्य सरकारकडून शाळांना नवीन नियामावली जारी काय आहे नियमावली वाचा सविस्तर
प्रतिनिधी (दि.२६ सप्टेंबर):-बदलापूर शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारामुळे राज्य सरकार आता मात्र खडबडून जागे झाले आहे.सरकारने राज्यातील सर्वच शाळांसाठी नवी नियमावली जारी केली आहे.प्रत्येक शाळांना हे नवीन नियम अनिवार्य केले आहेत. राज्य अनुदानासाठी मान्यता,अध्यापन माध्यमांमध्ये बदल आदींसाठी हे नियम बंधनकारक केले आहेत.
हि आहे शाळांना नवीन नियमावली
👉सीसीटीव्ही बसवणे
👉तक्रार पेटी बसवणे
👉दर आठवड्याला तक्रार पेटी उघडणे
👉विद्यार्थी दक्षता समिती
👉प्रत्येक कर्मचार्याचे चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे
👉सखी-सावित्री समितीच्या नवीन बैठका
👉विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी बैठका घेतात का?
👉विद्यार्थ्यांसाठी शाळेची स्वत:ची वाहतूक व्यवस्था
👉वाहनांना जीपीएस नेटवर्क आहे का?
👉स्कूलबसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी ठेवू नयेत
आदी विविध नियमांची यादीच सरकारने जारी केली आहे.राज्य सरकारने २४ सप्टेंबर रोजी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.