Maharashtra247

‘पीएम किसान’ चा हप्ता ५ ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 

 

अहमदनगर (दि.२६ सप्टेंबर):-पीएम किसान याेजने संदर्भात एक बातमी नुकतीच समाेर आली आहे.आता पीएम सन्मान निधी योजनेचा हप्ता ५ ऑक्टोबर २०२४ राेजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे.

योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती उपलब्ध 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्यांनी २००० रुपये मिळतात.दर वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. एप्रिल-जुलै,ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात.आता पीएम किसान याेजनेचा पुढील हप्ता ५ ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

You cannot copy content of this page