नेत्रज्योत फौंऊडेशन आयोजित नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद;हिवरगाव पावसा भाजपा कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने शिबीर यशस्वीरीत्या संपन्न
संगमनेर (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे नेत्रज्योत फौंऊडेशन,जैन सोशल फेडरेशनचे आनंदऋषीजी नेत्रालय अ.नगर आणि हिवरगाव पावसा भाजपा यांच्या संयुक्तपणे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मोतीबिंदू तपासणी,अल्पदरात चष्मे देण्यात आले. हिवरगाव पावसा भाजपा कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने नेत्र तपासणी शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाले.सदर नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांनकडून उस्पुर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरास मा.भाजपा तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे, सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,जेष्ठ संपादक यादवराव पावसे,केशव दवंगे,कैलास दिवटे, डॉ.भालेराव,डॉ.गौरव निकम,अग्रवाल मॅडम,शिंदे मॅडम,पांडे मॅडम,यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिरास सुरुवात झाली.मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये मोतीबिंदू तपासणी,अल्पदरात चष्मे देण्यात आले.सदर नेत्र तपासणी शिबिराचा २५० लाभार्थींनी लाभ घेतला त्यामध्ये महिला,जेष्ठ नागरीक,विद्यार्थी ग्रामस्थांकडून उस्पुर्त प्रतिसाद मिळाला. आनंदऋषीजी हॉस्पिटल अ.नगर येथे मोफत मोतीबिंदू शास्रक्रिया करण्यात येणार आहे.
नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश पावसे,गोरक्षनाथ पावसे सर,प्रकाश पावसे,अनिता दिवटे,किरण पावसे,सुरेश पावसे, मच्छिंद्र पावसे,सचिन सस्कर,चंद्रशेखर गडाख,उत्तम जाधव,विलास पावसे,अशोक पावसे,अशोक गोफणे,बजरंग पावसे,रवींद्र पावसे,देवराम पावसे प्रयत्न केले तर ग्रामस्त शिबिरास मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.