रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अहमदनगर (दि.४ ऑक्टो प्रतिनिधी):-रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.दि.२५/०५/२०२४ रोजी सकाळी ११:३० वा पासुन ते दि. २६/०९/२०२४ रोजी दुपारी ०३:३० वाजण्याचे दरम्यान यातील फिर्यादी यांचे भूषण नगर केडगाव अहमदनगर येथील राहते घराचे कडी कोयंडा उचकटुन चोरी केली आहे.
या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं। १०७६/२०२४ बि.एन.एस चे २०२३ चे कलम ३०५,३३१(३) ३३१(४) प्रमाणे गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की,सदरचा गुन्हा हा गणेश विठठल आव्हाड (वय-२४ वर्षे रा.गजानन कॉलनी साईरथ नगर वडगाव गुप्ता रोड एम.आय.डी.सी अहमदनगर ता.जि अहमदनगर) याने केला आहे.
अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर आरोपी हा एम.आय.डी.सी येथे त्याचे रहाते घरी आला आहे, अशी माहिती मिळाल्याने पोनि.प्रताप दराडे यांचे आदेशाने गुन्हे शोध पथकाने गजानन कॉलनी साईरथ नगर वडगाव गुप्ता रोड एम.आय.डी.सी येथे जावुन लागलीस त्यास मोठ्या शिताफीने पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्यांची नाव गणेश विठठल आव्हाड (वय-२४ वर्षे रा.गजानन कॉलनी साईरथ नगर वडगाव गुप्ता रोड एम.आय.डी.सी अहमदनगर ता.जि अहमदनगर) असे असल्याचे सांगुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंघाने चौकशी केली असता त्यानी प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यानी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असुन त्याचे कडुन गुन्हयातील गेला माल ३०,०००/-रु रोख किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकों/संतोष लगड करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे,पोहेकॉ.योगेश भिंगारदिवे,विशाल दळवी,सलीम शेख,पोकॉ/अभय कदम,अमोल गाढे,सतिष शिंदे,अतुल काजळे,पोकॉ/राम हंडाळ,फिंगरप्रींट युनिटचे अहमदनगर पोहेकॉ.रविंद्र गायकवाड दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ.राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.