आश्वी बु येथे डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ
संगमनेर (तालुका प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथे डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हा समाजकल्याण विभाग व डॉ.विखे पाटील फौंडेशन संचलित दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना नोंदणी’ व महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा नियोजन समिती अहिल्यानगर जनसेवा फौंडेशन स्त्री शक्ती संचलित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फूड प्रोसेसिंग युनिट” वितरण सोहळा डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी,ग्रामस्थ व लाभार्थी महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.