महिला व मुलींसाठी सुवर्णसंधी..अरविंद एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी संचलित नवरात्रीनिमित्त ९ गरजू महिला व मुलींना मोफत बेसिक पार्लर कोर्स करता येणार
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी):-छत्रपती संभाजीनगर येथील अरविंद एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी संचलित आत्मनिर्भर कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राकडून स्पेशल नवरात्रीनिमित्त ९ गरजू महिला व मुलींना मोफत बेसिक पार्लर कोर्स करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
अरविंद एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या संचालिका तथा सामाजिक कार्यकर्ते सौ.नेहा ढोके यांनी गरजवंत महिला व मुलींना पार्लर कोर्स करता यावा यासाठी नवरातरी निमित्त महिला व मुलींसाठी ही स्पेशल ऑफर ठेवलेली आहे.
यात तीन महिन्यांचा बेसिक कोर्स व फुल प्रॅक्टिस पूर्ण झाल्यानंतर या महिलांवर मुलींना शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती सौ.ढोके यांनी दिली.या कोर्स साठी आधार कार्ड व दोन फोटो देऊन आजच आपले नाव नोंदवून कोर्स पूर्ण करावा असे आवाहन संचालिका सौ.नेहा ढोके यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क 9545192809