पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आयोजित विशाल भीमसैनिक रॅलीस नागपूरला असंख्य भीमसैनिक जाणार जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड
नगर प्रतिनिधी:-धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून गेली 43 वर्षे प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली विशाल भीमसैनिक रॅली आयोजित करण्यात येत असते.यावर्षी पूर्वसंध्येला 11 ऑक्टोबर रोजी नागपूर या ठिकाणी 44 वी विशाल भीमसैनिक रॅली प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जयदीपभाई कवाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस,केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी,मंत्री उदय सामंत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.तरी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे,असे आव्हान जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड,प्रदेश सचिव प्रा.जयंत गायकवाड,जिल्हा संपर्कप्रमुख नितीन कसबेकर,जिल्हा उपाध्यक्ष विशाल गायकवाड,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गौतमी भिंगारदिवे, पत्रकार महेश भोसले,जिल्हा उपाध्यक्ष नितीन साळवे,शहराध्यक्ष संजय साळवे,सिद्धांत गायकवाड,अक्षय बोरुडे,सारंग पाटेकर,रोहित डोंगरे,अनिकेत विधाते, आयुष दहिवळे,सुरेश भिंगारदिवे,ज्येष्ठ नेते संपतराव भारुड,कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे,राहुरी तालुका अध्यक्ष अनिल पळगडमल,युवक जिल्हा सचिव सागर ढगे, शेवगाव तालुकाध्यक्ष संजय उन्हवने,नेवासा प्रमुख मधुकर पावशे, पाथर्डी प्रमुख विलास जयभीम,युवानेते सुनील जगताप आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी केले.