अहमदनगर प्रतिनिधी (दि.१७ जानेवारी):-जामखेड येथे अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करुन 20,60,000/- रु.(वीस लाख साठ हजार) किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.बातमीची हकिगत अशी की,श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द विशेष मोहिमेचे आयोजन करुन कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/विश्वास बेरड,संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी, पोकॉ/लक्ष्मण खोकले व पोकॉ/कमलेश पाथरुट असे जामखेड तालुक्यात अवैध वाळु उत्खनन व वाहतुकी विरुध्द कारवाई करीता पेट्रोलिंग करत असतांना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,एक इसम अहमदनगर-जामखेड रोडने एक पांढरे रंगाचे हायवा मधुन अवैधरित्या वाळु भरुन चोरी करुन वाहतुक करत आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाली.पोनि/अनिल कटके यांनी नमुद माहिती लागलीच पथकास कळवुन पंचांना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या.नमुद सुचना प्रमाणे पथकाने पंचांसह अहमदनगर-जामखेड रोडने, सहारा हॉटेल समोर जावुन सापळा लावुन थांबलेले असतांना एक पांढरा आकाशी रंगाचा हायवा येतांना दिसला पथकाची खात्री होताच त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन थांबविले त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन वाहनाची पाहणी करता त्यामध्ये वाळु असल्याची खात्री झाल्याने सदर चालकास वाळु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस केली असता त्याने त्याचेकडे शासनाचा वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नसले बाबत सांगितले.त्यामुळे पथकाने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) अनिल सोमनाथ राळेभात (वय 25, रा.जमादारवाडी,ता. जामखेड)असे सांगितले. त्यास हायवा मालकाचे नाव विचारले असता त्याने 2) नितीन परमेश्वर आजबे(रा. जमादारवाडी,ता.जामखेड) याचे मालकीचा असले बाबत माहिती दिली त्याचा दिले पत्त्यावर जावुन शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपीने अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळु अवैधरित्या चोरी केल्याने 20,60,000/- (वीस लाख साठ हजार) रुपये किंमतीचा एक हायवा व सहा ब्रास वाळुसह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द जामखेड पो.स्टे. गु.र.नं.19/23 भादविक 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोस्टे करीत आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधीकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
