रिपाईच्या मध्यस्तीने कंत्राटी कामगारांचे उपोषण सुटले;सर्व पक्षीय नेत्यांची यशस्वी शिष्टाई
श्रीगोंदा प्रतिनिधी:-नगरपरिषद श्रीगोंदा आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांच्या वतीने दि.3 ऑक्टोबर 2024 रोजी पासून सुरू असलेले आमरण उपोषण आज दि. 05 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच तिसऱ्या दिवशी रिपाइं (ए ) चे जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ गायकवाड तसेच काँग्रेस नेते घनश्यामजी अण्णा शेलार,बीजेपी नेते विक्रम दादा पाचपुते आदी सर्वच माजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मध्यस्थीने उपोषण सोडवण्यात आले.
काँग्रेस नेते घनश्यामजी अण्णा शेलार यांनी सांगितले की नगरपरिषद कंत्राटी कामगारांना आपल्या हक्काचे पैसे मागण्यासाठी जर उपोषण करावे लागत असेल आणि त्यांना चार चार महिन्याचे वेतन दिले जात नसेल तर ही निंदनीय बाब आहे.विक्रम दादा पाचपुते म्हणाले की नवरात्री मध्ये गेल्या तीन दिवसापासून महिलांचा उपवास घडत आहेत परंतु अशी परिस्थिती परत येऊ नये हे सदबुद्धी देवीने नगर परिषदेच्या कंत्राट दाराला देवो ही इच्छा व्यक्त केली कुठल्याही मागण्यासाठी किंवा प्रश्नांसाठी उपोषणाची वेळ येऊ नये अशी ताकीतच कंत्राटदाराला देण्यात आली.
या उपोषणाला जाहीर पाठिंबा असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड म्हणाले आत्तापर्यंत नगरपरिषदेमध्ये वेळोवेळी काय पत्रव्यवहार केलाय हे त्यांनी इथे नमूद केले मागील एक वर्षापासून ज्या काही कामगारांच्या अडीअडचणी आहे त्याचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडण्यात आला येत्या काळामध्ये श्री.दीपक भाऊ निकाळजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( A) चे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशाने नगरपरिषद श्रीगोंदा कंत्राटी कामगारांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही दीपक भाऊंनी जिल्हाध्यक्षांना दिलेले आहेत हे या ठिकाणी नमूद केले.नंदुभाऊ ससाणे यांनी कामगारांच्या व्यथा इथे मांडण्याचे काम केले आहे आणि या अगोदरही वेळोवेळी कामगारांसाठी जे काही केलेले काम आहे ते सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला या उपोषणास उपस्थित असलेले सचिनजी घोडके रिपब्लिकन पार्टी ऑफ (A) जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण,गणेश सांगळे जिल्हा संघटक, नाना सांगळे जिल्हा सहसंघटक,फरीद इनामदार,अक्षय लागडे, विकास शिंदे,संदीप घोडके,मयूर घोडके, शुभम आठवले,आपला काळे,पहिला काळे,पिनू ससाने,बाबू ससाने,जय ससाने,सुभाष ससाने, अमृत काळे,संतोष ससाने,महादेव ससाने, मयूर ससाने,साहिल ससाने,नागेश उमाप, बबन ससाने,दीपक ससाने,सतीश ससाने,नितीन घोडके, मयूर संजीवन घोडके, आकाश घोडके,मोहन कोथिंबिरे,भारती घोडके, रावी राजघ,आशा नरवडे,अनिता घोडके, विजयमाला घोडके,सुनिता घोडके,आशा रंधवे,ललिता गोहिरे,पूजा घोडके,सारिका घोडके,रंजना घोडके,सविता घोडके,जयश्री घोडके,मीना घोडके आदी महिला कामगार व पुरुष कामगार तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.