शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाला दोघांची मारहाण तोफखान्यात गुन्हा दाखल
अहमदनगर (दि.११ ऑक्टो):-शहरातील तारकपूर ते सिव्हील हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर वाहतुकीची झालेली कोंडी सोडवण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी अतुल बाजीराव लगड हे गेले असता चारचाकी वाहनातून आलेल्या दोघा इसमानी या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवार दि.9 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल लगड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमोल संभाजीराव गोंडे व सुनील सदाशिव पेटारे (दोघे.रा.राहुरी) यांच्या विरुद्ध सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.