आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस बाहेर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार
मुंबई प्रतिनिधी:-उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
तीन व्यक्तींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला.मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.