Maharashtra247

विजयादशमीच्या मुहूर्तावर पहिल्या टप्प्यातील तारकपूर काँक्रिटीकरण रस्ता नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला आ. संग्राम जगताप

 

अहिल्यानगर (दि.१३ प्रतिनिधी):-विजयादशमीच्या मुहूर्तावर पहिल्या टप्प्यातील तारकपूर कॉंक्रिटीकरण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.या रस्त्याचे लोकार्पण नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की,आज विजयादशमी दसरा आहे दसऱ्याच्या निमित्त नगरकरांना पहिला सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता त्यातला एक पहिला टप्पा एक बाजूने पत्रकार चौक ते तारकपूरपर्यंत काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे व त्याचे आज नागरिकांकरता उद्घाटन करून रस्ता खुला करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यापासून १५० कोटीचे कामे नगर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असून परंतु तारकपूर हा रस्ता त्यात नसून तो सेप्रेट रस्ता असून तो १८ कोटींचा आहे.यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून नगर शहरात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला हा निधी उपलब्ध झाल्याने हळूहळू विकास कामांना सुरुवात झाली परंतु मध्यंतरी लोकसभेच्या आचारसंहितेने काम होऊ शकले नाही.

लोकसभेच्या आचारसंहितेनंतर लगेचच नाशिक शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता लागली त्यामुळे विकास कामांना थोडा वेळ लागला परंतु आता शहरात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. शहरातील अनेक गल्ल्या व बोळ्या यांचे काँक्रिटीकरण जवळपास पूर्ण झाले आहे.शहरातील प्रमुख रस्ते यांचे ही काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन झाले असून व त्यांचेही काम लवकरात लवकर सुरू होणार आहे अशी माहिती यावेळी आ.संग्राम जगताप यांनी दिली.तसेच यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरातील नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page