Maharashtra247

शेवगांव नगरपरिषदेला अखेर पूर्णवेळ मुख्याधिकारी श्रीमती विद्या घाडगे यांची नियुक्ती..

 

शेवगाव (अविनाश देशमुख):-शेवगांव नगरपरिषदेला गेल्या कित्येक महिन्यांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नव्हते.शेवगांव शहर पाणीपुरवठा योजनेत असंख्य अडथळे निर्माण करणारे वादग्रस्त मुख्याधिकारी सचिन राऊत यांची तडकाफडकी बदली झाल्याने त्यांचा कारभार पाथर्डीचे मुख्याधिकारी संतोष लांडगे हे पाहत होते.

शेवगांवच्या नागरिकांची बऱ्याच दिवसांची पूर्णवेळ मुख्याधिकारी असावेत म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती त्यांच्या जागेवर पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणुन श्रीमती विद्या घाडगे यांची नवीन मुख्याधिकारी म्हणुन निवड झाली आहे त्या येत्या सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी कार्यलयात हजर होणार असल्याची माहिती मिळत आहे.

नवीन मुख्याधिकाऱ्यां समोर नवीन शहराची रखडलेली पाणीपुरवठा योजना शहरातील घनकचरा व्यवस्थापन सध्याच्या पाणीपुरवठ्यात असलेला ढिसाळपणा आदी आव्हाने उभी आहेत.आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर होत असलेली शहराच्या समस्यांवर विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांची आंदोलने हाताळणे व निवडणुकीची तयारी करणे हे सुद्धा हे सुद्धा एक आव्हानच आहे.

You cannot copy content of this page