शेतकरी महिलेस गुंड प्रवृत्तीच्या माणसांकडून जीवे मारण्याची धमकी;पाथर्डी पोलिसांची अद्यापही कारवाई नाही
पाथर्डी प्रतिनिधी:-मौजे बाभूळगाव येथे शेतजमीन असलेल्या व मुंबई येथे राहत असलेल्या पीडित शेतकरी महिलेस तिच्या स्वतःच्या शेतजमिनीत जात असताना तिला गावातील गुंड प्रवृत्तीचे लोक कायम दमदाटी व जिवे मारण्याच्या धमक्या देत आहे.
तसेच तिने लावलेल्या स्वतःच्या शेतातील पिकांची नासधूस करून पिकं चोरून नेतात याबाबत पीडित शेतकरी महिला सविता बाळासाहेब ठोंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशन येथे रोहिदास लक्ष्मण मोरे,रोहिदास यांची पत्नी,प्रशांत रोहिदास मोरे,मयुरेश रोहिदास मोरे (सर्व रा.वैजू बाबुळगाव ता.पाथर्डी) यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
हे सर्व जण पीडित महिलेस गावात शेतात गेली असता कायम धमकावत असतात व जातीवाचक बोलत असतात.यावरून पिडित महिलेने रोहिदास लक्ष्मण मोरे याच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात विनयभंग व ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे.हा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेवर दबाव आणला जात आहे.मात्र पाथर्डी पोलीस कोणतीही अशी ठोस भूमिका घेत नसून आरोपींना अटक करत नाही त्यामुळे पिडीतेला न्याय मिळत नसून येत्या २४ ऑक्टोबर रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करणार असल्याचे पीडित शेतकरी महिलेने महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.